* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YUGANDHAR IS ANOTHER NOVEL OF SHIVAJI SAWANT BASED ON THE LIFE OF KRISHNA, A GREAT CHARACTER IN MAHABHARATA AND OTHER NARRATIVE EPICS AS WELL AS THE GOD OF THE HINDUS.YUGANDHAR IS ONE OF THE BEST AND MOST FAMOUS NOVEL OF MARATHI LANGUAGE AND IT IS AWARDED WITH MANY OF THE PRIZES AND AWARDS GIVEN BY THE SAHITYA ACADEMY.
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूसनीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!

No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarTanmay Mandarekar

    आनंद,भावना,प्रेम,विश्वास या चर्तुश्वांनी जोडलेल्या भावरथाचा `नंदीघोष` पाहिला. भरधाव वेगाने दौडणारा ,कपिध्वज फडकणारा ` नंदीघोष` दुरून ही नजरेत येत होता. क्षणार्धात रथाचे आवेग आवळले.. एक गौरवर्णी गांडीवधारी व्यक्ती रथातून अलगद उतरली अन भूमातेला स्पर्शकरून निश्चल अवस्थेत बसली. त्या नीलवर्णी शांतमूर्तीतून बासरीचे मंजुळ स्वर येऊ लागले की सुदर्शनाचे तेज वाढू लागले.अजितंजय धनुची प्रत्यंचा ओढली गेली .पाहता पाहता नीलवर्णी देह चराचर व्यापून टाकला. विश्वाच्या कानाकोपऱ्यातून दोन शब्दांनी जयघोष मांडला.. कृष्ण ..कृष्ण..कृष्ण.. या मुरलीधर गिरीधारीचे विराट रूप पाहता अर्जुनाच्या ही डोळ्याचे पारणे फिटावे. असा हा मनमोहन, सुदर्शनचक्रधारी समजावा तरी कसा ? ज्याने राधाराणीसह प्रेमयोग मांडला तर दारूका सह सारथ्ययोग खेळला.. त्या भगवद्गीतेने अर्जुन पावन झाला तर श्रीमदभागवताने उद्धव उद्धरला.त्याने प्रेम भावनांचे प्रतीक असे `भाववृंदावण` निर्मिले.पश्चिम सागराच्या तटावर सुवर्णी द्वारीका स्थापिली.या विश्वाच्या नियंत्याला जाणून घेण्यास युगानेयुगे पार पडावी, हेच त्या विश्वनारायनाचे भाग्य!! या विश्वनिर्मात्याला एकेरी नावाने उद्बोधण्यात स्वारस्य वाटावे,अशी त्या मधुसूदनाची महती..त्याचे जीवन म्हणजे हजारो पाकळ्यांनी बहरलेले कमलपुष्पच. जिच्या प्रत्येक पाकळीवर त्याच्या प्रत्येक कृतीचा भावार्थ लपला आहे.या भावविश्वाचे कमल दल उमलावे अन त्या भावरसात आकंठ वहावे. या भावरसात गीतेचे अमृत बोल आहे ..तर भागवत पुराणाचे अगाध ज्ञान .. हे मनमोहना, जरी देवांच्या पदी क्षीरसागरात विराम करीत असलास, तरी आजही या पृथ्वीवर वावरताना दिसतोस.. तुझ्या बाळलीलांनी गोकुळ बहारतोस. जिथं मुरलीचे धून चरचरांत मधुर स्वर निर्माण करतात,तर तू मांडलेला भावरास आजही भाववृंदावणात फेर धरीत आहे. तुझा जन्म जरी त्या बंदिवानांच्या कैदेतील असला,तरी लटक्या बोलांनी सारं गोकुळ खेळवलंस.अपार लीलांनी असुरांचा लीलया वध केला.पण तुझी कोणतीही कृती अतिशयोक्ती नव्हती, मानवजातीच्या आवाक्याबाहेरची नव्हती.तुझा जन्म हेच नमूद करीत होता की ," तू मनुष्यरूप धारण केलं आहे, तुझी कृत्ये ही मनुष्यकसोटीस उतरणारी असावी". तरी तुला अवतारी मानण्यापेक्षा तुझं महान मनुष्यपण जाणणे, योग्य वाटावे. जरी देवाचा अवतार असला,तरी आपलेपणाची भावना हेच तुझं मोठेपण.. भावार्थ काय? तर माणूस हा देवाला देव्हाऱ्यात पुजून त्याच्या चरित्रास केवळ देवालाच शक्य होते , असे म्हणून त्याच्या सर्व लीलांची एकाधिकारशाही देवत्वावर सोडून मोकळा असतो.. पण तुझी महान कृत्ये ही देवत्वापेक्षा श्रेष्ठ मनुष्यासम भासतात. म्हणूनच तू नर श्रेष्ठ असून युगानुयुगे तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तुझ्या सत्मार्गावर चालणे, हेच मनुष्यकर्म. तू कधीही कोणत्या राजसिंहासनावर बसला नाही. कधी कोणतं उत्तरदायित्व स्वीकारले नाही. केवळ कर्तव्य केलं. प्रेमयोग मांडला.कंस वधानंतर उग्रसेन यांना मथुरेचं महाराज पद बहाल केलं. द्वारीका निर्मिली.पण राजपद वसुदेवांकडे दिलं. करवीरच्या श्र श्रुंगाला वधलं.नरकासुराचा वध केला. जरासंध भीमाकरवी मारला तर शिशुपालाचा शिरच्छेद केला..पण कधी राजगादी हस्तगत केली नाही.अन्यायकारी राजांचा वध करून तेथील जनतेस मुक्त करणे,हेच आद्यकर्तव्य. त्यांच्याच पुत्रांच्या खांद्यावर राज्य सोपवून पुढील कर्तव्यास मार्गक्रमण करणे,हीच तुझी नीती..!! महाभारत या महागाथेचा कर्ता, करविता अन कर्मयोगी म्हणजे श्रीकृष्ण.. महाभारत हे केवळ महायुद्ध नव्हते तर महायज्ञ होता. तिथं रक्ताची,त्यागाची,नात्यांची,प्रेमाची ,भावनांची समिधा अर्पण करावी लागली.या महायज्ञातून निष्पन्न झाली महातेजाची ,महाज्ञानाची कर्मगाथा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ हे पद्मनाभा ,जिथं अर्जुन सारखा महारथी हताश होऊन समरभूमीवर बसला,तेव्हा कृष्णबोलीतून कर्मगीता सांगितली.कर्माची जाणीव करून दिली. सारा आर्यावर्त ज्या युद्धासाठी कुरुक्षेत्र व्यापला होता ,त्या महायज्ञाचा यज्ञकर्ता तूच होता. तसं दुर्योधन, दुशासन,शकुनी यांचा एका क्षणात शिरच्छेद करता आला असता,द्रौपदीचे वस्त्रहरण घडताना लज्जारक्षणासोबत सुदर्शनाचे प्रक्षेपण करून उभा हस्तिनापूर रक्तरंजित करण्याची तुझी शक्ती होती.पण तसं तू केलं नाही.कारण तुला या महायज्ञाचे महत्त्व पटवून द्यायचं होतं. युगानेयुगे जगाला शिकवण द्यायची होती. जिथं नाती गोती,आपलं-परकं बाजूला सारून जीवन सार द्यायचं कर्तव्य तुला पार पाडायचे होते . या महासंग्रामात तू कधीच शस्त्र हाती घेतलं नाही, केवळ भूषविले सारथ्यपद..हा सारथ्य योग जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी केला होता,हे तुलाच ठाऊक!! तू जलपुरुष आहेस,असं म्हणतात. म्हणजे मथुरेची यमुना वा द्वारकेचा दर्या.जिथं पाणी तिथं तू..युद्धानंतर मात्र तू द्वारकेत विसावलास.त्या उत्तर कृष्ण अध्यायात मात्र उन्मत यादवांचा विध्वंस झाला.तुझे प्राण प्रिय पुत्र ,यादवसेन सारे यादवीत मारले गेले.. बलरामाने ही दर्याजलात प्राणार्पण केला. त्या प्रभास पावन क्षेत्री तुझा अध्याय संपवण्याचा काळ आला..जाता जाता उद्धवाला `उद्धव गीतेचे` भावामृत देऊन गेलास अन अश्ववृक्षाच्या घनदाट सावलीत पायाच्या तळव्यात तीर घुसला अन या कृष्ण जीवनाचा अंत केलास.. या वासुदेवाला जाणून घेण्यास हा जीवन यज्ञ ही अपुरा पडावा. युगानेयुगे जन्म घेतला,तरी तू कळणार नाहीस रे.. अनंत हस्ते द्यावे या सर्वेश्वराने.. घ्यावे किती या दो कराने... परम अवतारी..सुदर्शन चक्रधारी.. तुझं एक रूप जाणायला हे जीवन अपूरे पडावं,तिथं त्या पार्थाने कसं विश्वरूप जाणलं असावं.तू परम अवतारी आहेस. तुझ्या इशाऱ्यावर या कळसूत्री बाहुल्या नाचतात..अखेर तूच सुत्रधार.. तुला शोधायचं तरी कुठं? मथुरा,वृंदावन, गोकुळ,द्वारका,कुरुक्षेत्र सारं धुंडाळलं. पण तू गवसला नाहीस.. तू चराचरात आहे असं म्हणतात. पण तू दिसत नाहीस.नजरेत येत नाहीस.जाणवते ते तुझं `अस्तित्व`. कानी पडतात तुझ्या भावमुरलीचे सुरेल स्वर..कदाचित त्या स्वररागात तू लपला असावा!!! असा युगानुयुगे शिरी धारण करावा असा युगंधर नक्की वाचा ...Read more

  • Rating StarSanjay Dhote

    अरे जबरदस्त! मी वाचली आहे ही कादंबरी .

  • Rating StarAtul Junnarkar

    पुस्तक वाचून झाल्यावर आनंद म्हणजे काय ? हे समजले व डोळे पानावले खूप सुंदर

  • Rating StarRutuja Pardeshi

    इतकी देखणी भाषा की सहजच वाचणारा तिच्यात गुंतत जातो!

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो